उस्मानाबाद -: तेर (ता.जि. उस्मानाबाद) येथील श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्राचा जिर्णोध्दार शिलान्यास समारंभ 27 मार्च रोजी अखिल दिगंबर जैन सैतवाल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे यांच्या हस्ते होणार आहे.
भगवान महावीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तेरची भूमी आहे. जवळपास अडीच हजार वर्षापासून तेर येथील जैन मंदिरामध्ये भगवान महावीर यांचे साक्षता समशरण आले होते. त्यामुळे तेर येथील श्री 1008 भगवान महावीर अतिशय क्षेत्र येथे प.पू. 108 श्री पवित्र सागरजी महाराज यांच्या सानिध्यात व प्रेरणेने भव्य मंदीर जिर्णोध्दार शिलान्यास समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर जिर्णौध्दार करताना भव्य-दिव्य असे मंदीर, समशरणाची प्रतिकृती, यात्रेकरुंची व्यवस्था यासह अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गेवराई येथील बाबुसेठ जैन उपस्थित राहणार आहे. ध्वजारोहण मुरुड येथील अभिनंदन पांगळ यांच्या हस्ते तर दिपप्रज्वलन परळी येथील ओमप्रकाश मुळजकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लातूर येथील सुधाकरराव आळंदकर यांच्यावतीने प्रसाद देण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 27 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भगवंताचा अभिषेक होणार असून त्यानंतर दहा वाजता ध्वजारोहण, दिप्रपज्वलन होणार आहे. अकरा वाजता नवनिर्माण मंदीराचा शिलान्यास, सकाळी साडे अकरा वाजता प.पू. 108 पवित्र सागरजी महाराज यांचे प्रवचन तर दुपारी दीड वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यासह परिसरातील जैन श्रावक-श्राविक मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री 1008 दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष राजन देशमाने व महामंत्री बाबुराव पांगळ यांनी केले आहे.