उस्मानाबाद -: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात साक्षरता शिबीर मुख्य न्यायदंडाधिकारी आणि सी. पी. गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.            
       यावेळी दिवाणी  न्यायाधिश वरिष्ठस्तर तथा सचिव विधी सेवा प्राधिकरणचे   पी. बी. मोरे, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर तथा सचिव विधी सेवा प्राधिकरणचे जी.बी. गुरव, यु. टी. पोळ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अॅड राम गरड, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र गोवा वकील परिषद व गावचे सरपंच आवटी, उपसरपंच बी. वाय. गरड आणि इतर विधीज्ञ मंडळी यांची प्रमुख  उपस्थिती होती.
       यावेळी महिलांचे कौटुंबिक हिसाचारापासून संरक्षण या विषयावर अॅड व्ही. व्ही. चोरे यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरीकांचे हक्क व कायदे यावर अॅड श्रीमती वैशाली देशमुख यांनी तर विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 या विषयावर अॅड प्रतिक देवळे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी प्राधिकरणचे सचिव मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.                                   
 
Top