उस्मानाबाद -: जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी आचारसंहिता कक्षाचे काम सुरळीत व वेळीच पुर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या आदेशात अंशत: बदल करुन विधानसभा मतदारसंघनिहाय आचारसंहिता कक्षाचे काम पाहण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणूक आचार संहिता कक्ष प्रमुख तथा अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी यासंदर्भातील सुधारित आदेश जारी केले आहेत.
सदर अधिका-यांनी खालील अधिका-यांना नेमून दिलेल्या मतदार संघात जावून आचार संहितेच्या अनुषंगाने होणा-या कार्यवाहीबाबत चौकशी करुन अहवाल दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत आचारसंहिता कक्ष प्रमुखांना पाठविण्यात यावेत, असे आदेशित केले आहे.
यामध्ये विभागीय वन अधिकारी, उस्मानाबाद यांना -239- औसा विधानसभा मतदार संघ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना उस्मानाबाद- 240-उमरगा विधानसभा मतदार संघ, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना - 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघ, कार्यकारी अभियंता महावितरण, उस्मानाबाद यांना - 246 बार्शी विधानसभा मतदार संघ, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उस्मानाबाद यांना 243- परंडा विधानसभा मतदार संघ आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांना 242- उस्मानाबाद विधानसभा मतदार संघासाठी आचारसंहिता कक्षाचे काम पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे