उस्मानाबाद :- भारत निवडणूक आयोगाने ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक जयराज नाईक यांनी आज विविध यंत्रणांची बैठक घेऊन त्यांना राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची तपशीलवार नोंद ठेवण्याचे निर्देश दिले.
नाईक यांनी यांनी आज दिवसभरात विविध यंत्रणांच्या बैठका घेऊन निवडणूकविषयक खर्चाबाबत गांभीर्याने सर्व बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सुरुवातीला त्यांनी जिल्हा खर्चविषयक सनियंत्रण कक्षाची बाठक घेऊन उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत लक्ष ठेवण्याची सूचना केली. राजकीय पक्षांकडून अथवा उमेदवारांकडून दाखविलेला खर्च हा योग्यरित्या दाखविला जातोय का, याचाही तपशील तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ दक्षता पथक, फिरते पथक, पोलीस यंत्रणा, उत्पादन शुल्क, बॅंकेचे अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांना कामाबद्दल कल्पना दिली.
त्यानंतर नाईक यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत काटेकोर राहा, असे त्यांनी बजावले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख राहूल कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.