उस्मानाबाद -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुस-या दिवशी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. रोहन सुभाष देशमुख (रा. पोहनेर, ता. उस्मानाबाद) यांनी दोन तर प्रताप विलासराव जाधव (रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद) यांनी एक अर्ज दाखल केला.
       दुपारी तीन वाजेपर्यंत या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
 
Top