उस्मानाबाद -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी रोहन देशमुख यांनी आज गुरुवार रोजी अपक्ष म्‍हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपाला देण्‍याची मागणी लोकमंगल उद्योग समूहाचे अध्‍यक्ष सुभाष देशमुख यांनी केली होती.मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल्याने रोहन देशमुख यांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी रोहन देशमुख यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देशपांडे स्टॅन्डपासून निघालेल्या या रॅलीत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्‍यांनी डोक्यावर लोकमंगलची टोपी घातली होती तसेच हातात लोकमंगलचा झेंडा घेतला होता.
    या रॅलीत रोहन देशमुख यांच्या समवेत माजी खासदार सुभाष देशमुख, अविनाश महागावकर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्‍यासह  कार्यकर्ते, समर्थक सहभागी झाले होते. सदर रॅली उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर रोहन देशमुख यांनी जीपवर चढून भाषण केले.
 
Top