बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: राष्ट्रवादी जनरल कामगार संघ, नाका कामगार संघाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी माजी नगरसेवक शफिक करमाळकर यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या संघाच्या मेळाव्यात नूतन पदाधिकार्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, प्रवक्ते नवाब मलिक, संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदीक, मदन बाफणा, जिल्हाध्यक्ष नवनाथ चांदणे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत दाबाडे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांचे जुने सहकारी व कट्टर समर्थक असलेल्या करमाळकर यांनी यापूर्वी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, नगरसेवक, आरोग्य समितीचे सभापती आदी पदे भूषविली आहेत.
याबाबत करमाळकर म्हणाले, युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून १९८५ सालापासून सोपल यांचे निष्ठेने काम केल्यामुळेच जबाबदारी सोपविली आहे. या जबाबदारीने असंघटीत कामगारांचे संघटन व त्यांच्या समस्या सोडविणार असून, सोपल यांचे समाजविकासाचे विचार घेऊन यापुढेही काम करणार असल्याचे यावेळी सांगीतले.