उस्मानाबाद -: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने मदत व तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. याठिकाणी मतदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. या मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या निवडणूक विषयक तक्रारी नोंदवाव्यात आणि त्याचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन मदत व तक्रार निवारण केंद्राचे कक्ष प्रमुखांनी केले आहे.
याशिवाय संबंधितांना कक्षाच्या 02472-222545 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.मात्र, त्यासाठी नेहमीचा आकार लागू राहील.
याशिवाय संबंधितांना कक्षाच्या 02472-222545 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.मात्र, त्यासाठी नेहमीचा आकार लागू राहील.