उस्मानाबाद :- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि. 16 ते 21 मार्च,2 014 च्या मध्यरात्रीपर्यंत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
दि. 16 मार्च रोजी होळी, दि.17 मार्च रोजी धुलीवंदन, 19 मार्च रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे) आणि 21 मार्च रोजी रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.