उमरगा (लक्ष्मण पवार) :- शहरातील माणिकवार कॉम्प्लेक्समधील इंटर्स टॉवर्स लिमिटेडच्यावतीने दि. 4 ते 10 मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
इंडर्स टॉवर्सच्यावतीने उमरगा शहरात प्रथमच सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडर्स टॉवर्सचे विभाग प्रमुख राजेश औरादकर तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, पंचायत समितीचे आरोग्य विस्ताराधिकारी संजय शिंदे, एअरटेल कंपनीचे शाखा अभियंता चंद्रप्रकाश चव्हाण, इंडर्सचे सुपरवायझर काशिनाथ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेश औरादकर व संजय शिंदे यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगत आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हणून सुरक्षा सप्ताहाचे फायदे व तोटे याबाबतची माहिती उपस्थितांना सविस्तर दिली. त्यानंतर उपस्थितांचे आरोग्य तपासणी करण्यात आले.
यावेळी संदीप मोरे, सुदर्शन मोकाशे, कमलाकर सुरवसे, भागेश मसलगे, अनिल औताडे, आरोग्य विभागाचे राजेंद्र काळे, जितेंद्र चिंचोळे, बालाजी सोनवणे, केतुराज सुर्यवंशी, औदुंबर सुर्यवंशी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान इंडर्सच्या सर्व कर्मचा-यांना हेल्मेट, प्रमाणपत्र व कुटुंबियांना भेटवस्तू देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंडर्स टॉवर्सचे सुपरवायझर काशिनाथ बिराजदार यांनी केले तर औदुंबर सुर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला-पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.