बार्शी -: बार्शी तालुका हरिजन सेवा सेवक संघाच्या गांधी छात्रालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी दि. ११ मे रोजी घेण्यात येणार असून संपर्क क्रमांक अथवा पत्ता उपलब्ध नसलेल्या माजी विद्यार्थ्यांनी डॉ.भरत गायकवाड ९९२३५०००८१ यांच्‍याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    महात्‍मा गांधी यांच्‍या प्रेरणेने सन 1934 मध्‍ये या संघाची स्‍थापना झाली असून खूप विद्यार्थी उच्‍च शिक्षण घेऊन इतरत्र स्‍थायिक झाले आहेत. किसन कमळदा शेटे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली अ.दा. तहस्‍त्रबुध्‍दे यांनी बसतीगृहाचे संचालक म्‍हणून काम केले आहे.
 
Top