बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील पेशवा युवा मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत ओंकार भजनी मंडळास प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.
    धर्माधिकारी प्लॉट येथील श्री गणेश मंदिरात रविवारी दि.९ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. विविध सतरा भजन संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामदैवत श्री भगवंत, भगवान परशुराम यंाच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश धर्माधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालिका तेजाताई कुलकर्णी, मनोज बडवे, ऍड्.कैलास बडवे, सुशिल बडवे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून गजानन कुलकर्णी (सोलापूर), मिनाक्षी कुलकर्णी (सोलापूर), प्रसाद सहस्त्रबुध्दे, दैवशीला लिमकर (परंडा) यांनी काम पाहिले.
    या स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - ओंकार भजनी मंडळ , द्वितीय क्रमांक - ज्ञानेश्वर भजनी मंडळ , तृतीय क्रमांक - स्वामी समर्थ भजनी मंडळ, उत्तेजनार्थ - भगवंत भजनी मंडळ. विजेत्या संघास अनुक्रमे एक हजार, सातशे एक, पाचशे एक रुपयांचे रोख पारितोषिक व शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूर्यकांत देशमुख, व्यंकटेश, राहुल कुलकर्णी, आशिष दिक्षीत, आकाश , सुशिल, मनोज, निलेश, शाम व राकेश बडवे, नितीन देशपांडे, चंदन तांबडे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top