लोहारा -: घरजागेची ग्रामपंचायतच्या आठ- अ उतार्‍यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या चिंचोली (काटे, ता. लोहारा) येथील लाचखोर सरपंचाला लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी दि. २५ मार्च रोजी दुपारी चिंचोली-माकणी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
    येथील राजेंद्र पांडुरंग कोळी, कुसळंब (ता. पाटोदा, जि. बीड) येथील खंडेश्वर महाविद्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गावातील विमलबाई करदोरे यांच्याकडून मिळकत क्रमांक ५५ मधील १६६४ चौरस फूट घरजागा व त्यातील २५० चौरस फुटाचे घर ९९ वर्षांच्या करारावर वापरण्यासाठी घेतले. यासाठी त्यांनी दोन लाख ११ हजार रुपये करदोरे यांना दिले. या जागेची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद करण्यासाठी कोळी यांनी दि. ८ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला होता. यासाठी करारपत्राची प्रत व अन्य कागदपत्रही सादर केले होते. गेल्या चार महिन्यांपासून ते जागेची नोंद आठ- अ वर घेण्यासाठी सातत्याने ग्रामपंचायतमध्ये फेर्‍या मारत होते.
    लाचखोर सरपंच हरिश्चंद्र दादाराव जेटीथोर यांची कोळी यांनी सातत्याने भेट घेतली होती. मात्र, जेटीथोर याबाबत सातत्याने टाळाटाळ करत होता. ग्रामसेवकांनीही यासंदर्भात कार्यालयीन कामकाज पूर्ण केले होते. मात्र, जेटीथोर यांची सही राहिल्यामुळे नोंदणी केली जात नव्हती. कोळी यांच्याकडे जेटीथोर लाच मागत होता. यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सोमवार दि. २४ मार्च रोजी सरपंच जेटीथोर याने दहा हजार रुपये घेऊन येण्यास कोळी यांना सांगितले. यामुळे मंगळवारी माकणी परिसरातील एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्‍यांनी सापळा लावला. तेव्हा जेटीथोर याला दहा हजार रुपयांची लाच घेत असताना अटक करण्यात आली
    ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक नईम हाश्मी, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, हवालदार दिलीप भगत, सुधीर डोरले, बालाजी तोडकर यांनी केली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक भोसले या करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात लाचखोर अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यातच लोकप्रतिनिधींवर देखील लाच घेतल्याच्या आरोपातून अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील लाचेच्या प्रकरणातील लोकप्रतिनिधीला अटक करण्याची दुसरी घटना आहे.
लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात
लोहारा - घरजागेची ग्रामपंचायतच्या आठ- अ उतार्‍यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या चिंचोली (काटे, ता. लोहारा) येथील लाचखोर सरपंचाला लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी दि. २५ मार्च रोजी दुपारी चिंचोली-माकणी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.

Top