उस्मानाबाद : काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मंगळवार रोजी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापासून पदयात्रा काढण्यात आली.
शिवसेनेचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच ग्रामीण भागातून कार्यकर्ते शहरात दाखल होत होते. कुलस्वामिनी र्शी तुळजाभवानी, संत परीक्षक गोरोबाकाकांचे दर्शन घेऊन डॉ. पाटील यांच्या पदयात्रेला दुपारी साठे चौकापासून सुरुवात झाली. धारासूरर्मदिनी, दर्गाहमध्ये दर्शन घेऊन पदयात्रा नेहरू चौक, काळा मारुती, डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज चौक मार्गे लेडीज क्लबकडे रवाना झाली. डॉ. पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लेडीज क्लबवर मेळावा घेण्यात आला. पदयात्रेमध्ये उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह पाणीपुरवठामंत्री दिलीपराव सोपल, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, दिलीपराव देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहुल मोटे, बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, नरेंद्र बोरगावकर, सुरेश बिराजदार, काँग्रेसचे अप्पासाहेब पाटील, विजय दंडनाईक, डॉ. शरद पाटील निलंगेकर, बापूराव पाटील, सुनील चव्हाण, लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख आदी उपस्थित होते.