पांगरी (ता. तुळजापूर) :- तेरा वर्षीय शाळकरी मुलीला तिच्या मनाविरूध्द भेटवस्तु देण्याचा प्रयत्न करत तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग करत तिच्या नातेवाईकांना शिविगाळ दमदाटी करत तुम्ही आमचे कांही करू शकत नाहीस असा दम दिल्याची घटना जामगांव (आ) येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली.
विशाल सुनिल कोकरे व रूपेश उर्फ बापु विनायक देवकते (दोघेही रा. जामगांव) अशी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे असुन दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत विनयभंग पिडीत मुलीच्या वडिलांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांची मुलगी रविवारी बार्शी येथे सातवीची शिष्यवृत्ती परिक्षा असल्यामुळे गेली होती. परिक्षा देऊन ती घरी येऊन दारात बसली असता ओरोपी विशाल कोकरे याने रूपेश देवकते याने तुझ्यासाठी कानातील फुले दिल्याचे सांगितले. तसेच घरी कोणी नसताना हातवारे करून शिटया वाजवुन वाईट हेतुने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला इच्छेविरूदध भेट वस्तु देऊन तिला लज्जा वाटेल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच त्यांनाही दमबाजी केली. पिडीत मुलीच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसांनी दोघांविरूदध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रनस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अटक करण्यात आले असुन अधिक तपास हवालदार भापकर हे करत आहेत.