पांगरी (गणेश गोडसे) :- लातुर येथुन सोयाबिन घेऊन मुंबईकडे भरधाव वेगात निघालेल्या दहा चाकी ट्रकचा रॉड तुटल्यामुळे ट्रक दोनशे फुट खोल दरीत कोसळुन ट्रकने पेट घेऊन झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक व वाहक जखमी होऊन सतरा टन सोयाबिनसह ट्रक आगीत भस्मसात होऊन दहा लाख रूपयांच्याही पुढे नुकसान झाल्याची घटना लातुर-पुणे राज्यमार्गावर येडशी जवळील रामलिंग घाटात म्हसोबा मंदिरासमोर मंगळवार दि. 25 मार्च रोजी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात ट्रक सतरा टन सोयाबिनसह पुर्णतः जळुन खाक झाला आहे. ट्रकच्या चालक व वाहकांनी प्रसांगावधान ओळखुन चालत्या ट्रकमधुन बाहेर उडया घेतल्यामुळे जिवितहानी टळली. नागनाथ शंभु शिंदे (वय 36 रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद) व फुलचंद गाढवे (वय 25 रा.ढोकी) अशी ट्रक अपघातातील जखमी चालक व वाहकाची नांवे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व ट्रक मालकाकडुन प्राप्त माहिती अशी की, जखमी नागनाथ शंभु शिंदे हे त्याच्या ताब्यातील एम.एच.25 बी.9778 या दहा चाकी मालवाहु ट्रकमधुन लातुर येथुन सोयाबिन घेऊन येडशी-पांगरी मार्गे मुंबईकडे घेऊन जात असताना येडशी जवळील रामलिंग घाटात ट्रक आल्यानंतर अचानक स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक खोल दरीत कोसळत असल्याचे लक्षात आल्यामुळे ट्रकमधील शिंदे व गाढवे या चालक वाहकांनी वेळीच ट्रकबाहेर उडया घेतल्याने प्राणहानी टळली. ट्रकने 200 फुट खोल दरीत कोसळल्यानंतर ट्रकने पेट घेतला. मध्यरात्री घटना घडल्यामुळे तसेच वर्दळ कमी व ट्रक खोल दरीत असल्यामुळे मदत कार्य करताना डचनी येत होत्या. ट्रकने पेट घेतल्यामुळे त्यातील सतरा टन तिनशे साठ पोती व ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडुन जळुन खाक झाला आहे. दहा चाकी ट्रकचा घटनास्थळावर फक्त सांगाडाच निदर्शनास पडत होता. आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.