बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर) :- शहरातील अनेक ठिकाणी खुलेआम दारु विक्री होत असल्याने पोलिसांना खुले आव्हान बनले आहे व यातून शासनाची देखिल दिवसाढवळ्या फसवणूक होत आहे.
    शासनाने घालून दिलेले अनेक प्रकारचे नियम, अटी, महसूल वसुली, हिशोब तपासणी, पडताळणी, प्रत्‍येक वर्षी त्‍यांच्‍याकडून घेण्‍यात येणारी लायसन फीस, देण्‍यात येणा-या सुविधा यामुळे बार व परमीट रुम व्‍यावसायीकांना दिवसेंदिवस व्‍यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. याला अवैध व्‍यावसायिकांनी बेकायदेशीर पर्याय देखील उपलब्ध केला आहे व यावर अंकुश ठेवणे पोलिसांनी खुले आव्‍हान ठरले आहे. ज्‍यांच्‍याकडे कोणत्‍याही प्रकारचे लायसन नाही तेही सदरच्‍या बनावट दारु व इतर दारुविक्री, परवाना नसलेल्‍यांनाही दारु पिण्‍यास तसेच अल्‍वयीन मुलांना दारु पिण्‍याची परवानगी देण्‍याचे, विना परवाना दारु बाळगणे, बनावट अथवा परवानगी नसलेल्‍या ठिकाणची दारु विक्री करताना त्‍याचे आच्‍छादन बदलून विक्री करणे, गुंडगिरी प्रवृत्‍तींच्‍या व्‍यक्‍तींना थारा देणे अशा प्रकारचे गैरकृत्‍य करताना वेळोवेळी दिसून येत आहे.
    सदरच्‍या प्रकारामुळे परवानाधारकांच्‍या व्‍यवसायावर परिणाम होत असून शासनाचेही नुकसान होत आहे. शासनाच्‍या नियमानुसार सर्व प्रकारच्‍या दारुची विक्री केल्‍यास त्‍यावर आकारणी करण्‍यात येणा-या महसूलचे उत्‍पन्‍नदेखील नऊ ते दहा पटीने वाढ होण्‍याची शक्‍यत आहे. कर्नाटक तसेच गोवा भागातून कमी दरात विक्री करण्‍याचा परवाना असलेल्‍या दारुच्‍या मोठ्या प्रमाणात साठा इतरत्र विकला जातो व त्‍याचा सर्व ठिकाणी सुळसुळाट झाल्‍याचे दिसून येते. सदरच्‍या विक्री अगोदर त्‍याच्‍यावरील लायसन क्रमांक, तारीख, विक्री करण्‍याच्‍या ठिकाणचा तपाशी इत्‍यादी मजकूर बदलला जातो, अशी माहितीदेखील काहीजणांकडून बोलून दाखविल्‍याने समोर येत आहे.    सदरच्‍या बेकायदा व्‍यवसायात वरपासून खालीपर्यंत मोठमोठ्या बडया हस्‍तींचा हात गुंतलेला असल्‍याने कोणावरही कारवाई होण्‍याअगोदरच त्‍याला सावध करण्‍याची सावध भूमिकाही घेण्‍यात येते. कोणी अशा प्रकारची माहिती सांगितली तर त्‍याला हे आमचे काम नाही, ते महसूल विभागाचे व दारुबंदी विभागाचे काम आहे, असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. काही वेळा कारवाई झाली तर मालामध्‍ये अत्‍यंत कमी प्रमाण दाखवून प्रकाराची क्षमता सौम्‍य केली जाते. अनेक वेळा कारवाई केली असल्‍यास त्‍यात अडकलेल्‍या बड्या हस्‍तींची नावे जगासमोर येतील, म्‍हणून जाणीवपूर्वक माहिती दडवली जाते. अनेक बेकायदा दारु विक्रेत्‍यांना थ्री-स्‍टार वागणूक दिली जाते तर तक्रारदारास हिडीस फिडीस करुन त्‍याला मानसिक त्रास देण्‍याचे प्रकार होतात.
    बार परमीटरुम व्‍यावसायकि हे परवानाधारक असलेल्‍या व्‍यक्‍तींनाच दारु विक्री करत असल्‍याने सदरच्‍या ठिकाणी येणा-यांचे प्रमाण कमी होते तर कोणत्‍याही प्रकारची विचारपूस न करणा-या खानावळी, धाबे, हॉटेल्‍स, चायनीज सेंटर, टप-या, हातगाडे इत्‍यादी ठिकाणी मोठी गर्दी झालेली दिसून येते. सीसीटीव्‍ही लावण्‍याचे बंधनही परवानाधारकांना असून इतरांना कसलेही बंधन नाही. मधल्‍या काळात जास्‍त प्रमाणात बिअर शॉपीला परवानगी देण्‍यात आल्‍याने गल्‍लोगल्‍ली बीअरशॉपी दिसून येत आहेत. तर आजूबाजूला त्‍यासाठी हळूहळू बैठक व्‍यवस्‍थाही करण्‍यात आल्‍या. बिअरशॉपनी अथवा वाईनशॉप पेक्षा परवानाधारक बिअरबार परमीटरुम व्‍यावसायिकांना पाच टक्‍के जादा विक्री कर भरावा लागतो. मागच्‍या वर्षी परमीट रुमकरीता प्रतिवर्षी असलेल्‍या लायसनन फी मध्‍ये दिडपट वाढ करण्‍यात आल्‍याने सुमारे 1 लाख 21 हजारांच्‍या जागी 1 लाख 81 हजारांची रक्‍कम अगोदर भरल्‍याशिवाय परवाना नुतनीकरण करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्‍या व्‍यावसायिकांना आणखी आर्थिक भुर्दंड पडत आहे. बेकायदा वाहतुकीमुळे एस.टी. वेळोवेळी अडचणी सापडते व नेहमीच नुकसानीच चालविली जाते, त्‍याचप्रमाणे परमीटरुम चालकांचे काम सुरु आहे.
 
Top