बार्शी -: परवानगीपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर बार्शी पोलिसांनी कारवाई करुन वाहन ताब्यात घेतले आहे.
    कुर्डूवाडी बाह्यवळण रस्‍त्‍यावर वाहन क्रमांक एम.एच. 12 ई.एफ. 3774 यामधून सीना नदीतील वाळू शेंदरीकडे घेऊन जाताना रंगेहाथ पकडून कारवाई करण्‍ययात आली. याबाबत चालक रावसाहेब चव्‍हाण (रा. पानगाव, ता. बार्शी) व वाहनाचे मालक राम जाधव यांच्‍यावर 379, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 नुसार गुन्‍हा नोंद करुन त्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
 
Top