.jpg)
आलियाबाद (ता. तुळजापूर) येथे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ उस्मानाबाद व पंचायत समिती तुळजापूरच्यावतीने बंजारा महिला व युवतींसाठी आयोजित बंजारा ड्रेस व हस्तकला फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विलास खिलारे, साई महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती चव्हाण, सरव्यवस्थापक विजय जाधव, इंदुमती राठोड आदीजण उपस्थित होते.
बंजारा समाजातील महिला व युवतींसाठी दोन महिन्यांचा कालावधीत संपन्न होणा-या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी सुमन रावत यांनी बंजारा महिलांनी तयार केलेल्या ड्रेसची उत्सुकतेने पाहणी करुन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कुलस्वामिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, रविराज बडगुजर, सौ. शांतीप्रिया गवळी, शांतीनाथ राठोड, ग्रामसेविका डी.बी. मुसने, राजश्री चव्हाण, घमाबाई राठोड, रंजना राठोड, निर्मला राठोड, शांता चव्हाण, फुलाबाई राठोड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक विजय जाधव यांनी तर सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. तर विस्ताराधिकारी टी.जे. जाधव यांनी आभार मानले.
फोटो :- आलियाबाद (ता. तुळजापूर) येथे बंजारा ड्रेस हस्तकला व फॅशन डिझायनिंग उदघाटनप्रसंगी बोलताना मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन रावत.