बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कृषि पर्यवेक्षक गजानन वसंत पाटील वय ५७, रा.सोमराई नगर मोहोळ यांना गारपीठग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे व्यवस्थीत न केल्याने चोप दिल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
    तांदूळवाडी (ता.बार्शी) येथील शेतकरी अमोल उर्फ हनुमंत विष्णु गरड यांनी आपल्या नावावर पंचनामे करुन द्यावे यासाठी खुर्ची व शासकिय कागदपत्रे फेकून दिले, धक्काबुक्की केली व चष्मा फेकून दिल्याचे पाटील तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांत शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.कोटमाळे हे करीत आहेत.
 
Top