कळंब (भिकाजी जाधव) :- उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या उन्हाच्या तीव्रतेप्रमाणेच सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे वातावरण चांगलेच तापले आहे. मागील लोकसभा निवडणुका पेक्षा या पंचवार्षिक सोळाव्या लोकसभेची निवडणुक आचारसंहितेच्या बडग्यामुळे माठी जिकीरीची बनली असल्याने अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर नेतेमंडळीनाही याची झळ बसत आहे. त्यामुळे 'सोळावं वरिस धोक्याचं हो...' म्हणण्याची वेळ पुढा-यांवर आली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात तीन जिल्ह्यातील तालुक्याचा समावेश असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उस्मानाबादच्या लढतीकडे राहणार आहे. तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढत होण्याचे अंदाज वर्तवले जात असले तरी मुख्य लढत मात्र आघाडीचा सिंह अन् महायुतीचा वाघ यांच्यातच होणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकण्यास मिळत आहे.
आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड हे दुस-यांदा फडात उतरले असून जुन्या पैलवानांचा नवीन डाव कोण जिंकणार, याची चर्चा गावागावातील पारावर होत आहेत. गत निवडणुकांच्या जुन्या पैलवानांबरोबर काही नवख्या आणि प्रती पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीला उभा राहणारे बुजर्ग मंडळीही सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड, आम आदमी पार्टीचे विक्रम सावळे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. रेवण भोसले, भाजपाचे माजी खासदार सुभाष देशमुख यांचे पुत्र तथा लोकमंगल फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर शिवराज्य पक्षाचे बलराज रणदिवे हेही या फडात उतरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून प्रचाराचा धडाका सुरु केला असून मतदार संघाच्या तीन वेळेस दौरा पूर्ण केला आहे. तर उशिरा उमेदवारी जाहीर झालेल्या युतीच्या सरांनी ही जुने नवे स्वपक्ष व मित्रपक्षातील सरदार, मावळे जमा करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांनीही लोकमंगलच्या माध्यमातून केलेल्या कामाचे दाखले देत मतदार संघ पिंजून काढत आहेत. आम आदमी पार्टीचे विक्रम सावळे यांनीही गाठीभेटी घेऊन व फेसबुक वरुन प्रचाराला सुरुवात केली आहे.
एकूणच उन्हाच्या तीव्रतेबरोबर लोकसभा निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात चांगलेच तापले असून मी अन् माण पक्ष कसा धुतल्या तांदळासारखा आहे, हे उमेदवार कार्यकर्ते मांडत आहेत. तसेच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र यंदा प्रथमच ईव्हीएम मशीनवर सगळ्यात शेवटी वरीलपैकी एकही नाही. म्हणजेच नकारार्थी बटन आलयं हे उमेदवारांनी विसरु नये. शेवटी गुलाल कोणाला लागणार हा काळच ठरवेल.