बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उन्हाळ्यामध्ये जाणवणार रक्ताचा तुटवडा कमी करण्याच्या उद्देशाने पूज्य गुरुजी आनंदऋषीजी, गणेशलालजी महाराज व शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या स्मरणार्थ जीवनज्योत संघटने च्यावतीने घेण्यात आलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबिरात सहाशे रक्तदात्यांनी उत्‍स्‍फुर्तपणे रक्तदान केले़.
    रविवारी वर्धमान जैन स्थानक येथे कामगार नेते कॉ़तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली़. यावेळी वाचलनालयाचे अध्यक्ष गिरीधारीलाल तातेड, उद्योजक गौतम कांकरिया, बाळासाहेब तातेड, डॉक़ाका सामनगावकर, प्रा.व्ही़तिरुपती, रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ़विक्रम निमकर, वर्धमान जैन स्थानकाचे अध्यक्ष पारस कांकरिया, प्रा़दिलीप कराड,अशोक डहाळे, प्राक़ल्याण घळके, रक्तपेढीचे सचिव सुभाष जवळेकर, संघटनेचे अध्यक्ष तथा संयोजक अजित कुंकुलोळ, संतोष सुर्यवंशी, सुधीर जाधवर, विजय दिवाणजी, उमेश पवार आदी उपस्थित होते़.
    या शिबिरासाठी सोलापूर, उस्मानाबाद, सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढया तसेच बार्शीची श्रीमान रमाई शहा व उदगीरची नागप्पा आंबरखाने रक्तपेढया रक्तसंकलनासाठी उपस्थित होत्या़. रक्तदान करण्यासाठी तरुण, महिला यांचा सहभाग लक्षणीय होता़ या शिबीरात डॉ़सुनिल पाटील-अमिता पाटील, डॉ़प्रशांत मोहिरे,-वैशाली मोहिरे,डॉ़अमोल सुराणा-आरती सुराणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सपत्नीक रक्तदान केले़ या शिबीराला पोलीस उपअधिक्षक रोहीदास पवार,पो़ऩिसालार चाऊस, आपचे उमेदवार विक्रम सावळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटे, ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र सोमाणी, मल्लिनाथ गाढवे, अशोक सावळे, डॉ़ विजय गोदेपुरे,  यांनी भेट दिली़. शिबीर यशस्वीतेसाठी उदय पोतदार, राजेश राऊत, राहुल कुंकुलोळ, सागर नायकोजी, सुधाकर झरकर,धिरज कुंकुलोळ, पापा पटेल, मुन्ना माळी, महेश देशमाने,गिरीष चव्हाण, विनोद गायकवाड, सतिश नवगण, नागेश चाबुकस्वार, बापू वाणी, उमेश पवार, अमृता कुंकुलोळ, रुपाली सुत्रे, यश कुंकुलोळ, श्यामसुंदर शर्मा, राज कुंकुलोळ यांनी परिश्रम घेतले़.
 
Top