बार्शी (मल्लिकार्जून धारुकर) : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा बार्शीच्या वतीने होळी व रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेल्या हास्यरंग कार्यक्रमात बासरीवादन, विनोदी किस्से, विडंबन काव्य, चारोळ्या, उखाणे, हास्याचे प्रकार कविता सादर करण्यात आल्या, यावेळी बार्शीकर श्रोते हास्यरंगात बुडाल्याचे चित्र दिसून आले.
    रविवारी दि.२३ रोजी सार्वजनिक वाचनालय येथे हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षपदी रमेश लिंबकर, डी.आर.शेटे, हारुण तांबोळी, एम.डी.बोटे, शैला कुलकर्णी, अक्षदा कुलकर्णी, कमल शेटे, पांडूरंग कुलकर्णी, डॉ.संपदा केसकर, अरुण धारुरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ८६ वर्षीय निवृत्त प्राध्यापक प्रभाकर देशमुख यांनी बासरीतून तुझी चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु हे मराठी गीत सादर केले व लोप पावत चाललेल्या बासरीवादनास उजाळा दिला. क्षीरसागर, पानगावकर, जाधवर, मुलाणी, गव्हाणे यांनी विनोदी किस्से , विडंबन, चारोळ्या व उखाणे कथन केले. सुनिता घारे, प्रद्युम्न घारे यांनी एकाच वेळी आकाशवाणीच्या कोल्हापूर व सातारा केंद्र सुरु राहिल्यास होणारा विनोद सादर केला. निपाणीकर, महेश सातपुते, अनिल नारकर यांनी कविता, चंद्रशेखर कोरे यांनी हास्यांचे विविध प्रकार व चालण्याचे ढंग व त्यातील विनोद सादर केला.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाध्यक्ष पा. न. निपाणीकर, अनुराधा देशमुख, अनुराधा केसकर, जयश्री गवळी, विजयश्री क्षीरसागर, उपाध्यक्षा शारदा पानगावकर, सत्यभामा जाधवर, कार्यवाह शब्बीर मुलाणी, प्रकाश गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.
 
Top