
बार्शीतील घटनेत आरोपीची पत्नी सात वर्षापूर्वी मयत झाली आहे. त्याला 14 वर्षाचा व 9 वर्षाचा असे दोन मुले व पिडीत साडेसात वर्षांची मुलगी असे तीन अपत्ये आहेत. दोन्ही मुलांना त्याने एका आश्रमशाळेत ठेवले असून त्याच्या मयत पत्नीची बहीण (मावशी व चुलती असा दुहेरी नाते) आरोपीची भावजाय असून काही वेळ तिचा सांभाळ ती करत होती. आरोपी हा बाहेरुन घरी परतल्यावर मुलीला दररोज आपल्यासोबत घेऊन घराकडे जात होता. मावशीने मुलीला आंघोळ घालताना सदरचा प्रकार तिला समजला. यावेळी या अल्पवयीन मुलीस खूप त्रास होत असल्याने मावशीने सदरच्या घटनेची चौकशी केली. यावेळी तिच्या जन्मदात्या पित्याकडूनच तिचे लैंगिक शोषण झाल्याची कबुली मुलीने दिली. सदरच्या घटनेची फिर्याद मावशीने बार्शी पोलिसांत लेखी दिल्यानंतर बार्शी पोलीसांत गुन्हा नोंद झाला आहे. सदरच्या फिर्यादीवरुन 376, 2 (फ), लहान मुलांचे लैंगिक शोषण अधिनियम 2012 क 8 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेखा धस या करीत आहेत.
कायद्याचा धाक उरलेला नाही, आरोपींना पाहिजे तेवढी कडक शिक्षा मिळत नाही, अनेकवेळा गुन्हा दाखल करण्यासाठी टोकाची भुमिका घ्यावी लागले. गुन्हेगारांना मोकळीक देण्यासाठी जाणीवपूर्वक त्रुटी राहणे, शोषण झाले तरी कुटुंबातील इतर व्यक्तींकडून इज्जतीसाठी घटनेवर पडदा टाकणे, इतर कौटुंबिक व घरगुती प्रकारांना राग व्यक्त करण्यासाठी छळ करणे, फसवणूक करुन लैंगिक शोषण करणे, नशेमध्ये केलेले प्रकार, इंटरनेटच्या साधनाचा वापर करुन सातत्याने दाखविण्यात येणा-या पॉर्न साईटवर आळा नसणे, इतर ठिकाणच्या गुन्ह्यांचे चित्र सातत्याने विविध प्रसिध्दीमार्फत समोर येणे, विविध जाहिरातींमध्ये वापरण्यात येणारे विक्षीप्त तसेच अश्लिल हावभाव, परदेशी संस्कृतींचे प्रदर्शन, वृत्तवाहिन्यांवरील काही सिरीयलमधून सतत दाखविण्यात येणारी लफडी अशा अनेक प्रकारांचा विपरीत परिणाम अनेकांवर होत असल्याचे काही घटनेतून समोर येते.
दिल्ली येथील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर जणू काही साथच निर्माण झाली, असे चित्र निर्माण होत आहे. या घटनेच्या पूर्वीही अनेक महिला व स्त्रीयांचे लैंगिक शोषण झाले आहे. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने शासनाने कठोर भूमिका घेऊन आणखी कडक कायदे बनविण्याची गरज निर्माण होत आहे. परिणामकारक घटनांवर देखील अंकुश ठेवण्याची गरज आहे.