बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आधुनिक काळामध्ये शेतीचे काम करतांना इतरांनाही योग्य मार्गदर्शन करावे कोंबडे झाकायचे दिवस आता नाहीत, नोकरीच्या मागे लागण्याऐवजी शेतीचा विकास करुन प्रगती करावी, प्रत्येकाच्या झोपडीत लख्ख उजेड पडावा असा प्रयत्न आपल्यासह अनेकजण करत असल्याचे कृषिभूषण दादासाहेब बोडके यांनी म्हटले.
महाराष्ट्र शासन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, कृषि विज्ञान केंद्र सोलापूर व कृषिराज फार्मर्स क्लब खामगांव यांच्या यंयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या किसान गोष्टी या कार्यक्रमात खरबुजामध्ये पॉलिफिल्म तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समन्वयक डॉ.एल.आर.तांबडे, प्रगतशीर शेतकरी बाबुराव भोसले, ग्रो टेकचे तज्ञ समन्वयक मंगेश बागुल, सहयोगचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, पी.ए.गोंजारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी श्री गायकवाड, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आनंद झिने आदी उपस्थित होत.
दादासाहेब बोडके म्हणाले, तरुणांनी वेळेचे भान राखावे इतर देशातील केल्या जाणार्या शेतीचा अभ्यास करावा महिला असो वा पुरुष प्रत्येकाने शेतामध्ये कष्ट करावे. काही ठिकाणी ग्रामीण भागातील मुले टपरीवर रिकामटेकडी बसलेले तर काही ठिकाणी हातात पत्ते घेऊन वेळ वाया घालवतांना दिसतात ते पाहून दु:ख होते. इतर देशातील स्त्रीया शेतीमध्ये कष्ट करतांना दिसून येतात. आपण काय पेरणार हे इतरांना समजू नये असा प्रयत्न काही शेतकरी करत असल्याचे चित्र यापूर्वी होते परंतु आता अनेक शेतकर्यांनी एकत्र येऊन शेतीचा विकास व नवनवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होत नसल्याचे दिसून येते. विविध प्रयोग केल्याशिवाय चांगले अनुभव दिसून येणार नाहीत. नोकरीच्या मागे लागण्याऐवजी ढोबळी मिरची, कांदा, पपई यासारखी विविध पिके घेऊन सामुहिक विकास साधावा. याबरोबरच प्रत्येकाने आपले ध्येय ठेवून वेळेचे भान ठेवावे प्रत्येकाच्या झोपडीत विकासाचा लख्ख उजेड पडावा असे स्वप्न आपण पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. एल.आर.तांबडे म्हणाले, खरबूज ६५ दिवसांचे हे पिक असून सहा ते साडेसहा हजार फळ, सुमारे बारा टन आणि बाजारभाव तीस ते बत्तीस रुपये मिळाल्यास एकरी दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पादन मिळवूण देणारे हे पिक आहे. खर्च सोडला तरी निव्वळ १ लाख रुपये नफा मिळू शकतो. हे आळशी लोकांचे पिक नाही रुग्णालयाच्या आयसीयू विभागातील पेशंट प्रमाणे पिकाची काळजी घेणे गरजेचे असते व शेतकरी शेतात कायम उभा असायला हवा. पाण्यातून विरघळणारे खत, झाडाच्या अवस्थेप्रमाणे, मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये, मल्चिंगचा वापर, प्रोटेक्टीव्ह कव्हर तसेच कृषि विभागाकडून यावर विविध प्रकारचे प्रयोग व संशोधने होत आहेत. एकट्या दुकट्याने अशा पिकांचे प्रयोग केल्यास त्याची दखल वेळीच घेतली जात नाही त्याकरिता गटशेती फायदेशीर राहते. मालाची उचल पडतळ, विश्वासार्हता वाढते. या पुढील पायरी म्हणजे कंपनी स्थापन करुन डायरेक्ट विक्री करण्यासाठी, महिला बचत गट इत्यादींच्या माध्यमातून पुढे येत आहे. दत्तात्रय जाधव म्हणाले, अनेक ठिकाणी सध्या दिड-दिड किलोपर्यंतच्या गारा पडून नैसर्गिक आपत्ती आली आहे. यामुळे शेतकर्यांसमोर नवनवीन संकटे येत असल्याने परिस्थिती अनेक वेळा हाताबाहेर जाते, शेतकर्यांनी बदल करुन वेगवेगळी पिके घ्यावी. पहिले पिक खर्चात, दुसरे पिक निसर्काच्या कोपात गेले तरी तिसरे पिक उत्पन्न मिळवून देईल याबाबत आशावादी रहावे. शेतकर्यांच्या युवा पिढीने शेतीची मोहिम हाती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमधील प्रयोग करावे. जैविक खतांचा जास्त वापर करावा. मोहन भोसले म्हणाले, ठोंबरे व त्यांच्या सहकार्यांची जिद्द असल्यामुळे ज्या गावात येण्यासाठी चांगली वाट नसायची त्या ठिकाणी शेतीचे चांगले प्रकल्प राबविले जात आहेत. खामगाव हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द होते विदर्भात या ठिकाणच्या कांद्याला चांगली मागणी होती, या ठिकाणी गटशेतीचा प्रयोग हा आश्चर्याचा धक्का होता. दहि विरझन घेतल्यासारखे विविध ठिकाणच्या बियाणांचा वापर करुन विविध प्रकारचे प्रयोग केले जातात. यावेळी आत्मा केंद्राच्या वतीने गटशेतीला प्रोत्साहन देण्याससाठी ५ हजारांचा धनादेश देण्यात आला. मंगेश बागुल म्हणााले, भेंडी व कांदा या मर्यादित पिकापुरते गाव अशी ओळख असतांना बॉबी जातीच्या खरबुजाचा प्रयोग झाला यावेळी सर्व प्रकारचे मार्गदर्शन दिले. यामध्ये प्रोटेक्शन नेटचा प्रयोग यशस्वी झाला त्यामुळे कोणत्याही प्रादुर्भावाशिवाय पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. मर, कॅ्रकींग, वातावरणातील बदल अशा अपवादात पिक सापडले नाही. तंतोतंत व्यवस्थापन करण्यात आले आहे. यावेळी भगत पिंपळखुटे, नवनाथ कसपटे यांनी विचार मांडले. शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूरसंचलन व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल पाटील, झांबरे सर, सुधाकर करंडे, सोमनाथ लाखंडे, शशिकांत शितोळे, हरिश्चंद्र मुठाळ, जयसिंग नाईकनवरे आदींनी परिश्रम घेतले.