पांगरी (गणेश गोडसे) :- नातेवाईकांवर केस करन्याच्या किरकोळ कारणावरून आठजणांनी मिळुन एकीच्या घरात घुसुन लोखंडी गज व काठीने बेदम मारहान करत गळयातील व कपाटील सोन्याच्या वस्तुंसह 73 हजार रूपयांचा मुद्देमाल नेल्याची घटना वालवड (ता. बार्शी) येथे घडली आहे.
    मंगल राम जाधवर (वय 52, रा. वालवड, ता. बार्शी) असे गज व काठी हल्यात गंभिर जखमी झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नांव असुन हनुमंत भानुदास जाधवर, ज्ञानोबा हनुमंत जाधवर, मृदुका हनुमंत जाधवर, सोनाली हनुमंत जाधवर (चौघे रा. वालवड, ता. बार्शी), हुनमंत देविदास मुंढे, कैलास देविदास मुंढे, बालाजी देविदास मुंढे व देविदास नानाभाऊ मुंढे (चौघे रा. उपळाई, ता. कळंब, जि.उस्मानाबाद) अशी काठी व गजाने मारहान करूण जखमी करत पैसै नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
      जखमी मंगल जाधवर या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी तु आमच्या मेव्हन्यांवर खोटी केस करते काय असे म्हणत तिच्या गळयातील मनी मंगळसुत्र तोडुन घेतले व इतर आरोपींनी घरातील उघडया कपाटात ठेवलेले पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम सोन्याची चैन व रोख 10600 रूपये असा 73600 रूपयांचा माल घेऊन गेले. फिर्यादिच्या डोक्यात लोखंदी गज व काठीने मारहान करून शिविगाळ दमदाटी करत जिवे ठार मारण्‍याची धमकी दिली. पांगरी पोलिसात वरील आठजणांविरूदध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.
 
Top