बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जागतिक किर्तीचे नेत्र तज्ञ डॉ. तात्याराव लहाणे यांच्या उपस्थितीत बार्शीतील भगवंत इन्स्टीट्यूट येथे दि. १३ मार्च रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदगुरु परमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि आरएसएम समाजसेवा संस्था यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.
    ताडसौंदणे रोड येथील भगवंत इन्‍स्‍टीट्युट टेक्‍नॉलॉजी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे शिबीर होत आहे. बी.जे. मेडिकल कॉलेज पुणे येथील मुख्‍य अधिष्‍ठाता डॉ. अजम चंदनवाले, सोलापूर येथील सुप्रसिध्‍द नेत्र तज्ञ डॉ. उमा प्रधान हे उपस्थित राहणार आहे.
    नेत्र विकारांचे निदान, मोफत चष्‍मे वाटप करण्‍यात येणार आहे. आवश्‍यक त्‍या गरजू रुग्‍णांवर मोफत्‍ शस्‍त्रक्रियांचेही नियोजन होत आहे. या शिबीराचा लाभ गरजूंनी घ्‍यावा असे आवाहन आर.एस.एम उद्योग समूहाचे अध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे त्‍यांनी केले आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क आरएसम समाजसेवा संस्‍था बार्शी, डॉ. फटाले, डॉ. खांडेकर, डॉ. सोनल शहा, डॉ. मिरगणे, डॉ. नितीन मोरे, डॉ. आनंद मोरे, दत्‍ता अण्‍णा साळुंखे, डॉ. तुकाराम विधाते, राजाभाऊ मोरे, डॉ. तांबरे, पांडुरंग मते, डॉ. राजेंद्र गोरे, पाटील दिग्‍वीजय, डॉ. विकास क्षिरसागर, नंदकुमार जाधव, डॉ. कोकाटे, प्रभाकर डोंबाळे, डॉ. पत्‍की, पवार शशिकांत, डॉ. पंडित, वालवड, डॉ. मनोज वाघमोडे, डॉ. मिलींद सातपुते, बिभिषण पाटील, मदन गव्‍हाण, काका गायकवाड, डॉ. विलास लाडे, अविनाश शिंदे, धिरज पाटील, मालोजी देशमुख, बाळासाहेब पवार, संतोष काटे, राजकुमार पाटील, संभाजी आगलावे, संतोष गणेचारी, किरण गायकवाड, सौ. मंगल पाटील यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top