पांगरी (गणेश गोडसे) :- धोत्रे (ता. बार्शी) येथे एकाच रात्रीत अनेक ठिकाणी घरफोडया होऊन सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्य चोरटयांनी लंपास केल्याप्रकरणी व चो-या होऊनही पोलिस या घटनेबाबत अनभिज्ञच असल्याबात व गुन्हे दाखल करण्यास लोक का धजावत नसल्याबाबत दि. 14 रोजी तुळजापूर लाईव्ह ई-न्यूज पेपरवर सविस्तर वृत प्रकाशित होताच आज शुक्रवारी दुपारी अखेर अज्ञात चोरटयांविरूदध चोरीप्रकरणी पांगरी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले.
सौ.सुवर्णा लक्ष्मण लांडे (वय 40, रा. धोत्रे, ता. बार्शी) या महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्या रात्रीचे जेवन उरकुन आपल्या घरात झोपल्या असता दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकु आल्यामुळे त्या जाग्या झाल्या. तेव्हा घरात प्रवेश केलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या गळयाला चाकु लावुन गोधळ अथवा आरडा ओरड केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. इतर दोघांनी घरातील कपाटात त्यांच्या मुलाच्या लग्नाकरीता आणुन ठेवलेल्या पिळयाच्या अंगठया व बस्त्याचे साहित्य घेऊन गेले. तसेच त्यांच्यासह त्याच्या आईच्या गळयातील मनीम़ंगळसुत्र चोरून नेले. तसेच चोरटयांनी जाताना घरातील मोबाईल हॅण्डसेटही घेऊन गेले.
सौ. लांडे यांनी त्याच्याबरोबरच गावातील हरिश्चंद्र गणपती जाधवर, मच्छिद्र भिमराव आगवणे, महंमद शेख आदी लोकांच्या घरातही साडया तलाचे डब्बे व र्इतर साहित्याच्या चो-या झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. एकाच रात्रीत एकाच गावात एवढया मोठया प्रमाणात चो-या झाल्यामुळे पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीत खळबळ उडाली असुन रात्रगस्त वाढवण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतुन होत आहे. सौ.सुवर्णा लांडे यांच्या फिर्यादिवरून अज्ञात तिन चोरटयांविरूदध चाकुचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास हवालदार सुनिलदत बनसोडे हे करत आहेत.