भूम :- एका नवविवाहितेने आपल्‍या राहत्‍या घरी अंगावर रॉकेल ओतून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना भूम तालुक्‍यातील आंद्रुड येथे शनिवार दि. 15 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली.
    स्‍वाती अमोल ओव्‍हाळ (आंद्रुड, ता. भूम) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या नवविवाहितेचे नाव आहे. यातील स्‍वाती हिचा अमोल ओव्‍हाळ हिच्‍याशी 7 ऑक्‍टोबर 2013 रोजी विवाह झाला होता. सदरील मयत विवाहित तरुणी बारावी नंतर केज तालुक्‍यातील विडा येथे नर्सिंग कोर्सच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत होती. सदर मुलीचा पती अमोल पाच दिवसापूर्वी सासरी जाऊन मुलीला आपल्या गावी आंद्रुड येथे आणले होते. दि. १५ मार्च रोजी सदर मुलीच्या घरची मंडळी शेतात गेली होती तर पती आठवडी बाजारासाठी ईट येथे गेले असता स्वत:च्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा प्रकार घडला. घरातुन धुर निघत असल्याचे गावक-यांना दिसल्यानंतर सदर मुलगी मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मुलीचे चुलते सासरे गौतम ओव्हाळ यांनी वाशी पोलिसात खबर दिल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेंव्हा सदर मुलगी जाग्यावर मयत झाल्याचे दिसुन आले.
    मयत स्वातीचे शवविच्छेदन डॉ. पोतरे यांनी केले. सदर झालेल्या घटनेसंदर्भात मुलीकडील मंडळींनी आत्महत्या नसुन हत्या केली असल्याचे पोलिसांना तोंडी सांगितले व आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नयेत असा आक्रमक पवित्रा घेतला होता. सदर घटनेचा पुढील तपास हे. पो. काँ. सुधाकर पवार, भालेराव, पाटील करत आहेत. शवविच्छेदनानंतर प्राथमिक स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
भूम : एका नवविवाहितेने आपल्‍या राहत्‍या घरी अंगावर रॉकेल ओतून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना भूम तालुक्‍यातील आंद्रुड येथे शनिवार दि. 15 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली.

Top