उमरगा : उमरगा शहरातील काळा मठ या भागातील लाकडी फळ्याच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने घराचे व आतील पाच लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
    शहरातील काळामठ परिसरात सेवा निवृत्त प्रा. बी. ए. बीराजदार यांच्या शेजारी गोविंदराव पाटील यांचे लाकडी फळ्याच्या शेडचे घर होते. या घरात भाड्याने राहून मोलमजुरी करणारी मंगलादेवी पांडूरंग ब्याळे ही या घरात आपल्या मुलासह राहते. मोलमजुरीसाठी त्या घराच्या बाहेर गेल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली तेंव्हा मंगलादेवीचे दोन मुले अंजली व उज्वल घरात होती. ते घाबरून घराच्या बाहेर पळत आली तेंव्हा घरात ठेवलेली ४० हजाराची रक्कम एल. आय. सी. भरण्यासाठी ठेवली होती. व तीन तोळे सोने, पाच तोळे चांदी आदि साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी श्रीनिवास सगट, बसवराज स्वामी, प्रताप बिद्री, सुनिल मदने, गणेश अहंकारी, गोपाळ जाधव आदिंनी प्रयत्न केले.
 
Top