बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील राजेंद्र बाबुराव फावडे यांची रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती जिल्हा युवक अध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिली.
    संघटनेच्या बैठकीत निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी तालुका कार्याध्यक्ष हनुमंत भोसले, तालुका अध्यक्ष विकास गव्हाणे, उपाध्यक्ष अजित जगदाळे, वैराग विभाग प्रमुख सर्जेराव यादव, संपर्क प्रमुख शिवाजी गोरे, तात्या शिंदे, ठोंबरे गुरुजी, विकास पाटील, किसन यादव, ढगे गुरुजी, विनोद खरंगुळे, दिलीप चव्हाण, बाळासाहेब उमाटे, तानाजी मोहिते, नितीन पाटील, बाळासाहेब शिंदे, दशरथ सांगोळे आदी उपस्थित होते.
 
Top