सोलापूर -: येत्या लोकसभेसाठी उभे राहणा-या उमेदवारांनी, आपले निवडणूक खर्चाचे विवरणपत्र  निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, विहित नमुन्यात तसेच  वेळेत सादर करावे. अशी सुचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी केली.
     लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारी संदर्भात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, बॅंक अधिकारी व मुद्रक प्रकाशक (प्रेस) यांची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत त्यांनी   मार्गदर्शन केले.
     येत्या 18 मार्च पर्यंत निवडणूक संदर्भातील साधन सामुग्रीचे दर राजकीय पक्षांनी निश्चित  करून कॅफो कडे सादर करावे अशी सूचना जि. प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे यांनी केली. तर प्रेसवाल्यांनी छपाई वाल्यांनी छपाई पत्रकांची संख्या नमुद करावी त्याचबरोबर राजकीय उमेदवार – पदाधिका-यासाठी वेगळे काऊटंर बँकानी निर्माण करावे अशी अपेक्षा जि. प. चे वरीष्ठ लेखाधिकारी अजय पवार यांनी व्यक्त केली.
     या बैठकीसाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख  बँकाचे अधिकारी व शहरातील प्रेस मालक उपस्थित होते.
 
Top