उस्मानाबाद :- लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आता खर्च करताना विचारपूर्वकच करावा लागणार आहे. कारण संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर राहणार आहे.
यासंदर्भात, आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक खर्चासंदर्भातील घ्यावयाच्या खबरदारीबद्दलची माहिती देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, कोषागार अधिकारी तथा खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख राहूल कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी कदम यांनी राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाबाबत करावयाच्या कार्यवाहीची तपशीलवार माहिती दिली. उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर आता निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक खर्चाचा तपशील सदर कक्षाला कळविणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्ज भरताना काढलेल्या रॅलीचा खर्चही उमेदवारांच्या खात्यात नोंदविला जाणार असल्याचे कदम यांनी नमूद केले.
प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तस असा खर्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतू जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. उमेदवाराचे स्वताचे मालकीचे वाहन असेल तर अशा वाहनाचा फक्त इंधन व चालकाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. मात्र, उमेदवारांच्या इतर वाहनांचा खर्च त्यावर घोषित केलेल्या दराप्रमाणे उमेदवारांना द्यावा लागणार आहे. त्याची नोंद खर्च संनियंत्रण कक्षाकडे द्यावी लागणार आहे.
उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल, असेही त्यांनी सांगितले. उमेदवारांनी त्यांना दाखल करावयाच्या खर्चाबाबतचे नमुने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत. कोणत्याही प्रकारे याबाबतच्या अज्ञानाची सबब चालू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.