उस्मानाबाद :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे क्षयरोग जनजागरण रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष सुमन रावत यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅलीचा शुभारंभ केला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. टी. एच. माने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर. एन. देशमुख, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एन. फड, जिल्हा क्षयरोग केंद्र, जिल्हा रुगणाल्याच्या अधिसेवीका श्रीमती व्ही. के. पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या जनजागरण रॅलीत श्रीपतराव भोसले हायस्कुल, शरद पवार हायस्कुल ,जिल्हा परिषद (कन्या शाळा), मराठी, गाझी उर्दु हायस्कुल, छपपती शिवाजी हायस्कुल, इंदिरा गांधी नर्सींग कॉलेज, शासकिय परिचारीका प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद येथील विद्यार्थी ,विद्यार्थींनी व शिक्षक यांचा सहभाग होता.
तसेच क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर येथील काळजी व आधार केंद्रानी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून एआरटी,सेंटर येथे माहितीचा स्टॉल उभा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर चित्रकला व रांगोळी स्पर्धाही घेण्यात आल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.