उस्मानाबाद :- माजी सैनिकांच्या पाल्यांना व युवकांना सूचित करण्यात येते की, महासैनिक ट्रेनिंग सेंटर,कसबा-बावडा, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भारत नामांकन भारत सरकारचा सुरक्षा कोर्सअंतर्गत  30 दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या  प्रशिक्षणासाठीचे  शुल्क सात हजार रुपये आहे.
      यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना  भरलेली रक्कम शासनातर्फे परत करण्यात येणार आहे. त्याशिवाय मेस्कोकडून एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 0231-2663132,9422039718/9021550363 व 8378842449 व संपर्क साधावा. इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि). सुभाष सासणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मामानाबाद  यांनी केले आहे.        
 
Top