उस्मानाबाद :- अचानक अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकावर व चा-यावर विपरीत परिणाम झाल्याने जिल्ह्यातील जनावरांना चाराटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांस व पशुस चारा उपलब्ध व्हावा, यासाठी  चारा जिल्हृयाबाहेर  वहातूक करण्यास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रतिबंधाचा मनाई आदेश जारी केले आहेत.
       गुरासाठी कापून वाळवून ठेवलेले गवत, भूसा, कडबा, गवत, सुकलेला ऊस या सर्व प्रकारचा जनावरांचा चारा जिल्हयात चा-याची स्थिती समाधानकारक होईपर्यंत समक्ष अधिका-यांच्या परवानगीशिवाय जिल्हयाबाहेर चारा वहातूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
     जिल्हयाबाहेर जनावरांचा चारा वाहतूकीसाठी वारपण्यात येत असलेली वाहने तसेच वाहतूक करण्याच्या विचाराने साठवणूक केलेल्या जनावरांचा चारा,तपासण्याचा व अटकावून  ठेवण्याचा अधिकार जिल्ह्यातील त्यांचे कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्हा पशुसंवर्धन  आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, सर्व पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक  त्यापेक्षा वरच्या दर्जाचे पोलीस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सर्व वन क्षेत्रपाल, सर्व नायब तहसीलदार, महसूल व त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी, सर्व पुरवठा निरीक्षक व सर्व मंडळाधिकाऱ्यांना  गरजेप्रमाणे जनावरांना चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्याची मागणीनुसार रीतसर परवाने  देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी,उस्मानाबाद, उमरगा, भूम व कळंब यांना त्यांचे कार्यक्षेत्रापूरते प्रदान करण्यात आले आहेत.            
 
Top