उस्मानाबाद -: जिल्ह्यामध्ये कोठेही पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कमी पडणार नाही. याचे नियोजन आजपासूनच करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.नारनवरे यांनी जिल्ह्यात कोठे किती पाणी साठा आहे, त्यापैकी पिण्यायोग्य किती आहे. विंधन विहिरी चालू किती आहेत त्याप्रमाणे ज्या ठिकाणी जूनपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल त्या ठिकाणाहून टँकरद्वारे ज्या गावात पाणी नाही त्याठिकाणी पाठवणे आवश्यक असते. त्याकरिता ज्या-त्या भागात विद्युत फिडर किती आहेत याची माहिती घेऊन टँकर भरण्यास विद्युत पुरवठा खंडीत राहणार नाही. याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. जनावरांसाठी चारा किती उपलब्ध आहे व पावसाळयापर्यंत पुरेल का कमी पडत असेल तर तो कसा उपलब्ध करता येईल. व चारा पिकविणारे शेतकरी किती व कोठे आहेत. त्याची माहिती घेऊन नियोजन करण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या. पावसाळयामध्ये पाणी पुनर्भरण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करणे आदि सूचना संबंधित अधिका-यांना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.