नळदुर्ग -: कॉंग्रेसच्या राजकीय कारकिर्दीत गैरप्रकार झाल्यामुळे देशाची वाताहात झाली असून अनेकानी घोटाळे करुन आपली झोळी भरल्याचे टिका करुन सर्वसामान्य जनतेला प्रचंड महागाईस तोंड द्यावे लागत आहे. कॉंग्रेस सरकारने यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत, असे आरोप उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी जळकोट (ता. तुळजापूर) येथे बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकात महायुतीची प्रचार सभा घेण्यात आली, यावेळी प्रा. गायकवाड हे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच बंकट बेडगे होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आयुब पठाण, शिवसेनेचे गणेश सोनटक्के, कमलाकर चव्हाण, रिपब्लिकन पक्ष (आ.) युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. गायकवाड म्हणाले, देशाला बलशाही बनवून जगात महासत्ता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज असल्याचे सांगून देशातील जनता सुखी असेल तरच देश बलशाही होणार आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी आरुढ करणे जनतेची जबाबदारी आहे.
सभेचे सूत्रसंचालन अरुण लोखंडे यांनी केले. या सभेला मोठी गर्दी झाली होती.