बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उस्मानाबाद मतदारसंघातून पक्षप्रमुखांनी प्रा. रविंद्र गायकवाड यांना दिलेली उमेदवारी ही स्वागतार्ह आहे. शिवसेनेशी संबंध नसलेल्या अथवा शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य करु नये त्यांना तो अधिकारही नाही त्यांचा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करुन शिवसैनिकांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. कोणी ऐरा गेरा येऊन शिवसेनेने काय करावे असे म्हणत असेल तर त्याला शिवसेना उत्तर देईल असे मत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केले.
    सौंदरे (ता. बार्शी) येथे निवडणुकीसंदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब कापसे, नागजी नान्नजकर, सुनिल गोलकोंडा, डॉ.लाडे, जयगुरु स्वामी, महिला विभाग तालुका प्रमुख मंगलताई पाटील, उपशहर प्रमुख ज्योती सावंत, अनुराधा शिंदे, सौ.फावडे, चन्नाप्पा चौगुले, ज्ञानेश्वर पवार, विक्की झव्हेरी, प्रमोद सोनवणे, सुशांत गायकवाड, उ.ता.प्र. शिवाजी सुरवसे, विभाग प्रमुख नागनाथ भड, बप्पा लावंड, राजाभाऊ पाटील, अमोल जाधव, जयवंत काशीद, मोहन धर्मे, संतोष शेट्टी, संजय काळे, आंधळकर म्हणाले, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अनेक जण मोठे झाले आहेत. आर.पी.आय., शेतकरी संघटना व मित्रपक्ष यांच्या सहकार्याने शिवसैनिक हे रविंद्र गायकवाड यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील. त्याकरिता बुथ प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिकांनी प्रचार यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रचाराला लागावे. जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन रथयात्रा काढण्यात येणार आहे. रविंद्र गायकवाड यांना खासदार केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. याप्रसंगी शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी मनोगते व्यक्त केली.
 
Top