पांगरी (गणेश गोडसे) -: सोळाव्या लोकसभा निवडणुकीची प्रकिया सुरू होऊन काही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची यादीही जाहिर झाल्या असुन अनेकांनी अपक्ष नसीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. दैनंदिन नविन उमेदवारांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. अनेकजण आपणच निवडुन येऊन दिल्ली गाठणार अशा वल्गना करू लागले असले तरी गावोगावचे कार्यकर्ते मात्र अजुन त्यांना कोणाचीच रसद पोहच झाली नसल्यामुळे सध्या तरी वेट ऍन्ड वॉचच्याच भुमिकेत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्यातरी शेतकरी अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या तर कार्यकर्ते उमेदवारांच्या मदत व प्रचार निधीच्या प्रतिक्षेत आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बार्शी तिकडे सरसी अशीच कांहीशी अवस्था असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराची भिस्त ही बार्शीवरच राहणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विचारमंधन बैठका, गुप्त बैठका, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आदी प्रक्रियांना वेग आला आहे. निवडणुका एका महिन्यांवर आल्या असल्या तरीही निवडणुकांमध्ये म्हणावा असा रंग भरलेला नसुन कायकर्त्यांच्या खिशात जेव्हा रंगीबेरंगी नोटा हातात पडतील तेव्हाच ज्वर वाढणार आहे. सध्यातरी मात्र कोणीच कार्यकर्त्यांचा खिसा गरम करताना दिसुन येत नाही. गतवेळेचा ताटली बाटलीचा अनुभव असलेले कार्यकर्ते यावेळेस मात्र सुशिक्षीत झाल्यासारखे वागताना दिसत आहेत. अगोदर खिशात टाका नोटा मगच तमच्या पक्षाचा बांधेन फेटा असे सामान्य कार्यकर्तेही बोलताना दिसत आहेत.
गारपीठीत सापडल्यामुळे शेतकरी राजा सध्यातरी काळवंडलेल्या व भिजलेल्या ज्वारीची सुगी करण्यात गुंग झाला आहे. भ्रमनध्वनीवरुन पै.पाहुने नाती-गोती यासह आधुनिक प्रचार साहित्यांचा वापर मोठया प्रमाणात सूरू असला तरी कार्यकर्त्यांची प्रचार यंत्रणा मात्र म्हणावी अशी अजुनतरी कार्यरत झालेली नसल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांना खुपच खस्ता खाव्या लागणार आहेत. मतदार चानाक्ष व हुशार असल्यामुळे उमेदवरांप्रमाणेच त्यांच्याही अपेक्षेत खुप मोठी वाढ झालेली असुन अपेक्षापुर्तीनंतरच प्रचार यंत्रणेत हाटायच अस प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते उघड बोलताना दिसत आहेत.
प्रत्यक्षात उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात झाल्यानंतर व उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीत रंग वाढणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातुन आपले नशिब आजमावण्यासाठी अनेक हौसै नवसे गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले आहेत. तीन जिल्हे अकरा तालुके एक हजार गावांचा व सतरा लाख मतदारांचा समावेश असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील कांही भागात इच्छुक नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात प्रचाराचा श्रीगणेशा केला असुन जनतेमधुन मात्र अद्याप कोणालाच जवळ घेतले जात नसल्याचे बोलले जात आहे. अपवादात्मक वेळेस टिका टिप्पनीलाही सुरूवात झाली आहे. कार्यकर्ते मात्र त्या चर्चेची आनंदाने चव चाखत आहेत. उस्मानाबाद मतदारसंघात अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी लढण्यासाठीही कांही नेते मतदारांकडे कौल मागताना दिसत आहेत. एकंदर सध्यातरी मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने कांहीच म्हणावे असे वातावरण तयार झालेले नाही. कांही नेत्यांनी आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवलेली असल्यामुळे कोणता नेता कोणाच्या पाठीमागे ही गोष्ठ पडद्याआड राहील्यामुळे कार्यकर्तेही अंधारात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पहावयास मिळत आहे. उस्मानाबाद मतदारसंघात उस्मानाबादसह बार्शी, भुम, परंडा, वाशी, कळंब, औसा, लोहारा, उमरगा, तुळजापुर असा विस्तीर्ण भागांचा समावेश असुन नेत्यासह उमेदवारांना प्रचारफेरीही संपुर्ण मतदारसंघात करणे जिकरीचे जाणार आहे. कमी कालावधीत त्यांना खुप मोठे अंतर कापुन मतदारांशी संवाद साधावा लागणार आहे. निवडणुकीच्या अगोदरपासुनच कांहीजनांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर दिलेला असल्यामुळे त्यांना जरा सोईचे होत आहे. बार्शी तालुक्यातील मतदार कोणाला साथ देणार व कोणाला लाथ देणार यावर उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
कोण लढणार, कोण माघार घेणार, मतदार कोणाला कौल देणार व लढत दुरंगी की तिरंगी होणार हे लवकरच समोर येणार आहे. निवडणुकीत मात्र अजुनही रंग भरण्यास सुरूवात झाली नसुन गावोगावचे स्थानिक नेते मात्र अजुनही अंदाज घेण्यातच गुंतले आहेत. मतदारांच्या तोंडाला लोकसभा निवडणुकीमुळे तोंडाला पाणी सुटलेले असुन अजुन कांही काळ त्यांना तसेच ठेवण्यात नेतेमंडळींना मजा येत आहे. कार्यकर्त्यांचे खिशे गरम झाल्यानंतरच तेही कार्यकर्त्यांची फळी भक्कम करणार आहेत़. तेव्हाच ख-या अर्थांने निवडणुकीत रंग भरून वातावरण तयार होण्यास मदत मिळणार आहे.