पांगरी (गणेश गोडसे) :- आपण सत्तेत असू अथवा नसू जनतेसाठी कायम कार्यरत राहणार असुन जाहीर झालेल्या उमेदवारीत निश्चीतच बदल होऊन उमेदवारी मिळेल व पक्षाने नाकारले तरीही जनतेचा उमेदवार म्हणुन रोहन देशमुख यांना आपल्यासमोर उभे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन लोकमंगल उद्योग समुहाचे अध्यक्ष सुभाष बापु देशमुख यांनी केले.
रविवारी रात्री 8 वाजता पांगरी (ता. बार्शी) येथे परिसरातील गावांमधील कार्यकर्त्यांच्या विचरमंथन बैठकीत देशमुख हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे होते. तर यावेळी भाजपाचे बार्शी तालुकाध्यक्ष सतिश आरगडे, शशिकांत नारकर, शहाजी धस, कुलदिप जगदाळे, राहुल गोडसे, बिभिषण पाटील, मोरे मेजर, अमोल नांदेडकर, पांडुरंग पाटील, तात्यासाहेब घावटे यांच्यासह बार्शी तालुक्यातील बहुसंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
सुभाष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, आपण बार्शी तालुक्याचा जावई असुन जावयासाठी कांहीतरी करण्याची गरज आहे. आपण त्यातुन उतराई होताना कोणतीही कसुर करणार नाही. लोकांच्या आग्रस्हास्तव आपण लोकसभेच्या रणांगणात उडी घेण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. माणसांसाठी कांहीतरी करण्याची उमेद बाळगुन आपले समाजकार्य चालु असल्याचे सांगत आपण केलेल्या मदतीची नक्कीच उतराई होईल. सत्ता नसताना अनुदान नसताना जनतेच्या सकार्याने चांगले काम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी तुमच्या मतदारसंघात नॉट रिचेबल उमेदवार येऊ पहात आहेत त्यांना सांभाळा असे आवाहन केले. देशमुख हे जमिनीवर चालणारे असल्यामुळे त्यांना न्याय मिळणे गरजेचे असुन त्यांना पक्षाकडुन नक्कीच न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप युवा मोचार्चाचे शहाजी धस, तात्या घावटे, भोसले आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पांढरी, उक्कडगाव, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी, कारी, घारी, पुरी, झानपुर, ममदापुर आदी गांवांमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी मोठयासंख्येने उपस्थित होते.