बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शिक्षणाच्या नावावर पैसा कमावून मला बेचाळीस पिढ्यांचा उध्दार करायचा नाही, जात, पात, धर्म, पंथ न पाहता मला केवळ भारत मातेचा उध्दार करायचा आहे. हेतू आणि ध्येय शुध्द असल्यावर साधनसामग्री समाजच देतो असे मत चाणक्य मंडलचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
स्नेअस फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या सन्मानार्थ ९१ माध्यमिक व प्राथमिक शाळेतील छत्रपती स्पर्धा परिक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्रवारी दि.२८ रोजी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी स्नेअसचे अध्यक्ष सुधीर गाढवे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, डॉ.सायली गणकर, रवि फौंडेशनचे मधुकर डोईफोडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे, सुनिल अवघडे, शशिकांत नारकर, भारत पवार, उज्वला जाधव, डॉ.मनोज वाघमोडे, किरण मोरे, सुमंत गाढवे, उर्मिला गाढवे, संगीता कानगुडे, सज्जन साळुंके, टी.एन.मोरे, विश्वजीत ठोंबरे आदी उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, मानवाचे जीवन ही सर्वात मोठी परीक्षा आहे. स्पर्धा परिक्षेत चांगली कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना पैसा, सुरक्षितता, सामाजिक स्थान, अधिकाराची जागा उवा सत्ता या गोष्टी आपोआपच मिळतात परंतु त्यापेक्षा महत्वाची गोष्ट असते ती देशाची सेवा करण्याची संधी आणि त्यामध्ये मिळणारा आनंद वरील चारही गोष्टींपेक्षा अधिक असतो आणि चाणक्य मंडलचे विद्यार्थी हे चांगल्या संस्काराने घडविलेले असतात.
विद्यापीठाच्या गुणांवरुन प्रवेश मिळण्याचे व रट्टे मारुन गुण घेण्याचे दिवस संपले असून अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. पैसा मिळविण्यासाठी आपण शिक्षणाचा धंदा मांडलेला नसून तुकोबारायांचा वारसदार म्हणून काम करत आहे. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करुन शिकावे आणि आपल्या देशाकरिता काहीतरी चांगले करुन दाखवावे, कोणत्याही व्यसनापासून दूर रहावे, नोकरी लागल्यानंतर कोणत्याही वाईट वाईट मार्गाचा अवलंब करु नये इतकीच अपेक्षा व अट या विद्यार्थ्यांकडून संस्था करत असते. मुलांच्या व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परिक्षेकरिता ग्रामीण भागातील खूप विद्यार्थी मोठ्या शहरात येतात त्यांना शिक्षणासाठी त्रास सहन करावा लागतो. अनेकांची शिक्षण घेण्याची परिस्थितीही नसते, चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण गरिब विद्यार्थ्यांना अगदी मोफत देण्याची सोय आहे. बार्शी तालुक्यातील रमेश घोलप हा देखिल आपल्या संस्थेत शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने अत्यंत खडतर मेहनतीने शिक्षण घेतले त्यामुळे त्याच्या आयुष्याचे चीज झाले. इलेक्ट्रॉनिक युगाचा वापर करुन पुण्यासरख्या अत्यंत समृध्द शहरात देण्यात येणारे शिक्षण बार्शीसारख्या व अत्यंत ग्रामीण भागात देखिल जागेवर बसून घेण्याची सुविधा चाणक्य मंडल च्या वतीने उपलब्ध आहे. कमी खर्चात आणि गरिब विद्यार्थ्यांना परवडेल अशा स्वरुपात चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे, वैराग भाग प्रथम - आकांक्षा यादव, द्वितीय- प्राजक्ता वायकर, तृतीय - निलेश पाटील, माध्यमिक गट प्रथम- दत्तात्रय घोरपडे, द्वितीय- स्नेहल आवारे, तृतीय - निलेश पाटील, बार्शी प्रथम - सौरभ बाबर, द्वितीय - शिवलिंग घोंगडे, तृतीय - ओंकार घोंगडे, माध्यमिक प्रथम-अभिषेक जगदाळे, द्वितीय - वर्षा मुंढे, तृतीय - धनश्री राऊत विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.