बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तहसिलमध्ये चाप्टर केससंदर्भातील माहिती उपलब्ध करुन देण्याचा आग्रह करुन माहिती अधिकाराची धमकी देत गोंधळ घालून शासकिय कामात अडथळा आणल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत नोंद झाली आहे. तहसिलस कार्यालयाती लिपीक मदनसिंह परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत विकास वासुदेव पाठक यांनी कागदपत्रांची माहिती व त्याची नक्कल मागीतली, याबाबतची माहिती देता येत नसल्याचे सांगीतल्यानंतर माहिती अधिकारात माहिती घेण्याची धमकी देत हुज्जत घातली व गोंधळ केल्याची तक्राद देण्यात आली आहे. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर हजर केले . सदरच्या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉं. जावळे हे करीत आहेत.
    सदरच्या शासकिय तक्रारीवरुन कोणत्याही सामान्य नागरिकांना कोणत्याही भ्रष्टाचारी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अथवा जी माहिती हवी असेल त्याबाबत माहितीचा अधिकार वापरावा की नाही, कायद्याने माहिती मागविण्याची चर्चा केल्यास काही अधिकारी कायद्याचा दुरुपयोग करुन आपल्याच विरोधात शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याची खोटी फिर्याद दाखल करतील अशी भिती निर्माण होत आहे. सदरच्या घटनेत कितपत सत्य आहे याची खातरजमा न करताही फिर्याद नोंद केली काय अशी शंका अनेकांना निर्माण होत आहे. कायद्याने कोणत्याही तक्रारदारांची तक्रार लिहून घेणे हे पोलिसांचे काम असले तर मग कायद्याचा अधिकार हा सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगला अधिकार आहे मग त्याची चर्चा केली अथवा कोणतीही माहिती मागविण्यात येईल असे म्हटले तर लगेच त्याची फिर्याद देण्यात येते याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यात तथ्य आहे की चोराच्या उलट्या बोेंबा आहेत याचा खुलासा होणेही तितकेच गरजेचे आहे.
 
Top