उस्मानाबाद :-  आज बुधवार दि. 19 मार्च रोजी उस्‍मानाबाद शहरातील छायादिप लॉन्‍स येथे खा. सुप्रिया सुळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीस ना. दिलीप सोपल, खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, जीवनराव गोरे, जि. प. अध्यक्ष सुभाष व्हट्टे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, लेडिज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या महिला, युवती व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
 
Top