बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सर्वेश इव्हेंटसच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत समारोहात गायन, तबला, हार्मोनियम, पखवाज आदी आद्यांच्या गजरात जुगलबंदी व छोटा ख्याल गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांतून लहान गटात चिन्मयी सोपल तर खुल्या गटातून शितल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
रविवारी दि.१६ रोजी मातृमंदिर ढगे मळा येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे, ज्येष्ठ गायक हरिदास लिमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शास्त्रीय गायक प्रसाद सहस्त्रबुध्दे, तबलावादक हनुमंत फडतरे, हार्मोनियम वादक सुरेश फडतरे, सुरेश जाधव, शास्त्रीय व अभंगगायक सचिन नेवपूरकर, पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाने, निलेश मांजरे, डॉ.साने, दिपाली सहस्त्रबुध्दे, अमित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. मैफिलीच्या सुरुवातीस सहस्त्रबुध्दे यांनी बिरज में धूम मचायो श्याम हा छोटा ख्याल सादर केले. देसरागातील दादरा व संत चोखा मेळा यांच्या अभंगरचनेने गायनाची सांगता करण्यात आली. यानंतर पुणे येथील फडतरे बंधूंची जुगलबंदी, हार्मोनियमवरील यमन कल्याण, तबलामधील झपताल, नाट्यगीत व याद पिया की आए या ठुमरीने वादनाची सांगता करण्यात आली. यानंतर संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पंडित सचिन नेवपूरकर यांच्या राग जोगकंसने समारोप गायन केले. यावेळी वैविध्यपूर्ण आलापी, गमकयुक्त ताना, सरगम, लयकारी यांचा सुंदर मिलाफाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. अवघा रंग एक झाला आणि पाटा पुरते देई विठ्ठला या अभंगाने गायनाची सांगता झाली. छोटा ख्याल गायनातील विजेते स्पर्धक : लहान गटात प्रथम - चिन्मयी सोपल, द्वितीय - राजकमल आंधळकर, तृतीय - सिध्दी काकडे, उत्तेजनार्थ - सावनी सावळे, खुला गट प्रथम - शितल पाटील, द्वितीय - विजया शिंदे, तृतीय मयुरी आगावणे, उत्तेजनार्थ - प्रमोदिनी गायकवाड, या स्पर्धेकरिता स्मिता देशपांडे (सोलापूर), दैवशीला लिमकर (परंडा) यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.