बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील युगंधर परिवाराच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते बार्शी आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोमवारी दि. १७ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर नितीन भोसले, डॉ.बी.वाय यादव आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे मानकरी मनोरुग्णाचे तज्ञ व सुप्रसिध्द साहित्यीक डॉ.कृष्णा मस्तुद, रवि क्लाससेस व रवि पर्यावरणचे संस्थापक मधुकर डोईफोडे, शिवशक्ती अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.प्रकाश बुरगुटे, आनंदयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरपरिषदेचे गटनेते नागेश अक्कलकोटे, दै.संचारचे प्रतिनिधी सचिन वायकुळे, ज्वारीचे आंतरराष्ट्रीय व्यापारी तुकाराम माने, गोदावरी सातपुते, प्रमुल्ल भालशंकर, आशा मोरजकर, प्रसन्नदाता ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, पै.उस्मान बागवान यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.