नळदुर्ग :- गुन्ह्यातील आरोपींची अटकपूर्व जामीन होऊ न देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस नाईक यांच्या मार्फत फिर्यादीकडून दहा हजार रुपयेची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली. ही कारवाई मंगळवार दि. 18 मार्च रोजी दुपारी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे झाली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मुबारक नबीलाल शेख (पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक पोलीस ठाणे नळदुर्ग) व भिमसेन वसंतबुवा भारती (पोलीस नाईक, पोलीस ठाणे नळदुर्ग) असे लाच घेताना कारवाई करण्यात आलेल्याचे नावे आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अकबर फजल सय्यद (अॅटोचालक, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर), याचा भाऊ अजिज हा रंगारेड्डी हैद्राबाद येथील बालाजी इंन्टरप्रायजेस अँन्ड कन्सलटंन्सी नावाच्या कर्ज देणा-या कंपनीचा दीड वर्षापासून एजंट म्हणून काम करीत होता. पन्नास हजार रुपये कर्जासाठी एक हजार रुपये व एक लाख रुपयाच्या कर्जासाठी दोन हजार रुपये कर्जाच्या अर्जासह कंपनी घेत होती. अनेक लोकांचे अर्ज घेऊन कंपनीचे व्यवस्थापक कार्यालय बंद करुन पळून गेले. त्यामुळे सबएजंट असलेले भाऊसाहेब पांढरे व इतर 22 लोकांनी दि. 26 डिसेंबर 2013 रोजी अजिज सय्यद यांचे अपहरण करुन त्यास सोलापूर येथे डांबून ठेवले. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांनी अजिजच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अजिज यास सोलापूर येथून सोडवून आणले. त्याकरीता जीपचे भाडे व इतर मिळून असे साडे सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर दि. 28 डिसेंबर 2013 रोजी भाऊसाहेब पांढरे व इतर लोकांनी अकबर सय्यद यांच्या घरी लाठ्या, काठ्या, चाकू घेऊन गेले व घरातील महिलास शिवीगाळ करुन मारहाण केली व बघून घेण्याची धमकी देऊन अजीज सय्यद यास नळदुर्ग बसस्थानकावरुन अपहरण करुन अज्ञात स्थळी डांबून ठेवल्याची तक्रार पोलीसात केली, मात्र ती तक्रार पोलीस ठाण्यात नोंदून न घेतल्याने दि. 25 जानेवारी 2014 रोजी रजिस्टर पोस्टाने नळदुर्ग पोलीस ठाण्यास पाठविली. तरीही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. म्हणून त्यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी तुळजापूर न्यायालयात तक्रार दिली. त्यावरुन दि. 26 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश नळदुर्ग पोलिसांना दिले. त्यानुसार गुन्हा नोंदवून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला.
यातील फिर्यादीस शेख यांनी तुमच्या प्रकरणातील आरोपींची दि. 19 मार्च रोजी जामीन आहे. आरोपीची जमानत होऊ नये याकरीता दहा हजार रुपयेची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्यादीने केली. त्यावरुन पोलीस अधिक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलीस अधिक्षक पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक नईम हाश्मी, त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत देशमुख, हवालदार दिलीप भगत, पोलीस नाईक सुधीर डोरले, पोकॉं बालाजी तोडकर यांच्या पथकाने मंगळवार रोजी दि. 18 मार्च रोजी दुपारी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे सापळा रचून दहा हजार रुपयाची लाच शेख यांनी भारती यांच्या मार्फत स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडून कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नईम हाश्मी हे करीत आहेत.