पांगरी (गणेश गोडसे) :- केरसुनी बनवण्याच्या गृहउद्योगाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वच पारंपारीक लघुउद्योगांना अलीकडील कांही वर्षात बिकट परिस्थतीमधुन वाट काढावी लागत असुन ज्यांना योग्य मार्ग सापडलेला नाही, अशा अनेकांनी आपल्या अनेक वर्षांपासुन पिढी जात चालत आलेल्या पारंपारिक लघु उद्योगांना रामराम केला असुन काहीनी इतर व्यवसायात आपल्याला ओढुन घेतले आहे. दोरखंड, वाजंत्री, सुतारकाम, लोहारकाम यासह बलुतेदारी हा विषयच हळुहळु लोप पावत चालला असुन यामुळे अनेक व्यवसायही संकटात सापडलेले आहेत. तळागाळात रूजलेली बलुतेदारीची प्रथाच कालबाहय होऊ पहात असुन जुन्या काळापासुन चालत आलेल्या व पुरातन ठेवा असलेल्या विविध समाजोपयोगी प्रथा सांभाळण्याची जबाबदारी आजच्या समाजघटकांवर आहे.
सुताच्या व नायलॉनच्या आकर्षक रूपातील दोरखंडाना मागणी वाढत असल्यामुळे पुरातन काळापासुन चालत आलेली वाखापासुन दोरखंड तयार करण्याचा व्यवसाय संपुष्ठात येऊ पहात आहेत. ग्रामीण भागात चालणा-या अनेक पारंपारिक व्यवसायापैकी दोरखंड बनवण्याचा धंदा अलीकडे जवळजवळ बंद पडल्यातच जमा आहे. वाढते औदयोगिकरण, लोकांची टापटीप व आकर्षक साहित्यांकडे वाढत असलेली ओढ, निसर्गाचा असमतोल यासह अनेक कारणे ग्रामीण उदयोगांना संपवण्यासाठी ठरत आहेत.
वर्षभर शेतक-यांना वाखापासुन दोरखंड तयार करून पुरवठा करायचा व त्या पुरवठा केलेल्या दोरखंडावरच वर्षभराचे घराचे आर्थिक व इतर नियोजन ठरवायचे असा अलिखीत करारच शेतकरी व हे लघुउदयोजक यांच्यात असायचा. दोन्हीकडचीही मंडळी हे इमानेइतबारे पाळायचे. मात्र अलिकडील काळात प्लास्टीक व सुताच्या दोरखंडाला वाढती पसंती असल्यामुळे वाखापासुन दोरखंड तयार करण्याच्या एका समाजाच्या परंपरागत व्यवसायाला वक्र दृष्टी झाली आहे. या उद्योगी समाजावर संकट ओढवलेले असुन त्यांना उपजिवीकेसाठी इतर व्यवसायांवर अवलंबुन रहावे लागत आहे. पारंपारीक च-हाट, दोरखंड आदी वाखापासुन बनवण्यात येणा-या साहित्यांना मागणीच घटली आहे.
वाख तयार करण्यासाठी घायपाताचा वापर केला जायचा. ओढया-नाल्यांच्या कडेला असलेल्या झाडाझुडपातुन घायपाताची पाले सोधली जायची. नंतर त्या पानांची चिरफाड करून नंतर त्यांच्या लहान-लहान पेंढया बांधुन गावाच्या आसपास असलेल्या पाण्याच्या डबक्यात साधारण पाच-सहा दिवस त्या पेंढया भिजत ठेवल्या जायच्या. पेंढया भिजल्याची खात्री झाल्यानंतर वर काढुन त्यांना विशिष्ठ पिळ देऊन वाख तयार करूण त्याचे लहान मोठया दोरखंडात रूपांतर केले जाते. मात्र उवढया प्रक्रियेतुन जावुनही वाखाच्या दोरखंडाला मागणीच नसल्यामुळे हा व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहे.
नायलॉन व सुताच्या दोरखंडांना रेखीव व टिकावुपणामुळे मोठी मागणी आहे. बैलांच्या वेसणी, कंडे, मुसक्या हे साहित्यसुदधा बाजारपेठेत तयार व पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागले असल्यामुळे या किरकोळ किरकोळ व्यवसायांवर आपली रोजी रोटी भागवणारे समाजातील कांही घटक बेरोजगार बनत चालले आहेत. समाजातील पुढारलेल्या हाताच्या बोटावर मोजन्याइतका वर्ग सोडला तर आजही बहुसंख्य समाज हा आपले पारंपारिक व्यवसाय करूलच त्यावर गुजरान करत आहेत. सामाजिक, सांस्कृतीक, आर्थिक शोषणातुन समाज मुक्त होत असताना त्यांच्या उदरनिर्वाहाचा व इतर गोष्टींचा शासनाने विचार करून या वर्गासाठी कांहीतरी करणे गरजेचे असल्याच्या या समाजाच्या मागण्या आहेत.
काळया आईची ओटी भरण्याची चाहुल लागताच व पावसाची एखादी सर बरसुन जाताच बळीराजाला आठवणारा घटक म्हणजे सुतारदादा. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जुळवाजुळव शेतकरी सुतारदादा कडुन करतो. शेतीच्या आजारांची कामगत सुतारांनी करायची व त्या बदल्यात शेतातील पिके आल्यानंतर बलुतेदारी जपत सुतारांना ज्वारी गहु अथवा शेतात असेल ते पिक दयायचे अशी प्रथा आहे. मात्र अलिकडील काळात सुतारकामच नावाला उरले असल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपनामुळे उत्पन्नाची अपेक्षा राहीलेली नसल्यामुळे दोघांतील देवाण-घेवाण म्हणावी अशी घडताना दिसत नाही. तसेच आधुनिक हत्याचा वापर शेतीधंदयात वाढल्यामुळे सुतारकामासही म्हणावे असे महत्व राहीलेले नाही. त्याचाही परिणाम बलुतेदारी लोप होण्यावर होत आहे. शेतातील नांगरनी, कोळपनी, मोगडणी, पेरणी, काढणी, मळणी, आदी कामगत आधुनिक यंत्रणेदवारे होऊ लागल्यामुळे सुतारकामाचा विषयच बाजुला पडत आहे.