सोलापूर :-  42- सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मौजे धोत्री ता. द. सोलापूर येथील ईश्वर शिवराम नवगिरे व मुळेगांव ता. द. सोलापूर येथील दत्तु रेवणा बनसोडे या उमेदवारांनी लोकसभा निवडणूकीसाठी अपक्ष म्हणुन आपले अर्ज दाखल केले. 
       तर 43- माढा लोकसभेसाठी मौजे आव्हे पो. जांबुड ता. पंढरपूर येथील नवनाथ भिमराव पाटील या उमेदवाराने हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
    सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज (शनिवार) 6 जणांनी 15 अर्ज तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 6 जणांनी 10 अर्ज नेले. सोलापूर लोकसभा मतदासंघासाठी आज अखेरपर्यंत सुमारे 65 उमेदवारांनी 169 अर्ज तर माढा लोकसभेसाठी सुमारे 61 उमेदवारांनी 138 अर्ज नेले आहेत. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 मार्च आहे.
 
Top