उस्मानाबाद : जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्र. ४0९ अन्वये प्राप्त अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रकमेच्या देवाण घेवाणीचा व्यवहार करणार्‍या स्टेट बँक हैदराबादच्या सर्वशाखा व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा लोहारा आणि स्टेट बँक इंडिया शाखा, वाशी या २९ मार्च रोजी रात्री ११ वाजेपर्यंत उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जारी केले आहेत. २0१३-१४ या वित्तीय वर्षाचे रकमांचे सर्वव्यवहार २९ मार्च रोजी पूर्ण करणे आवश्यक आहे. ३0 व ३१ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टय़ा असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वशासकीय कार्यालये व जनतेला शासकीय रक्कमांचा बँकेत भरणा करता यावा व बँकेतून रक्कमा काढण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा, वरील बँका २९ मार्च रोजी रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 
Top